नीतिवचनं
२ सखोल समज असलेला नोकर निर्लज्जपणे वागणाऱ्या मुलावर अधिकार चालवेल;
मालकाच्या मुलांसोबत त्यालाही संपत्तीचा वारसा मिळेल.
४ दुष्ट माणूस दुखावणारे शब्द लक्ष देऊन ऐकतो,
लबाड माणूस दुसऱ्यांची निंदा ऐकतो.+
५ गरिबाची थट्टा करणारा आपल्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो,+
आणि दुसऱ्याचं संकट पाहून हसणाऱ्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.+
८ भेटवस्तू देणाऱ्याला ती मौल्यवान रत्नासारखी वाटते;+
तो जिथे जाईल, तिथे त्याला तिच्यामुळे यश मिळतं.+
९ जो अपराध क्षमा करतो,* तो प्रेम दाखवतो,+
पण जो त्याबद्दल सतत बोलत राहतो, तो जिवलग मित्रांची मैत्री तोडतो.+
१० मूर्खाला शंभर फटके मारूनही जो परिणाम होत नाही,+
तो समजशक्ती असलेल्या माणसाला एकदाच रागावल्याने होतो.+
११ दुष्ट माणूस फक्त बंड करण्याची संधी शोधत असतो,
पण त्याला शिक्षा देण्यासाठी क्रूर दूताला पाठवलं जाईल.+
१२ मूर्खपणात गुरफटलेला एखादा मूर्ख भेटण्यापेक्षा,
जिची पिल्लं पळवून नेलेली आहेत, अशी अस्वलीण समोर आलेली बरी.+
१३ जर एखाद्याने चांगल्याची परतफेड वाइटाने केली,
तर त्याच्या घरावर संकटं येत राहतील.+
१४ वाद सुरू करणं हे धरणाचे दरवाजे उघडण्यासारखं* आहे.
भांडण पेटण्याआधीच तिथून निघून जा.+
१५ दुष्टाला निर्दोष ठरवणारा आणि नीतिमानाला दोषी ठरवणारा,+
अशा दोघांचीही यहोवाला घृणा वाटते.
१६ मूर्खाकडे बुद्धी मिळवण्याची संधी असूनही,
ती मिळवण्याची त्याला इच्छाच नसेल, तर काय उपयोग?+
१९ ज्याला भांडण्याची हौस असते, त्याच्याकडून चुका होतीलच!+
जो आपलं फाटक उंच बांधतो, तो नाशाला आमंत्रण देतो.+
२० कपटी मनाच्या माणसाला यश मिळणार नाही,+
आणि जो लबाडपणे बोलतो तो संकटात सापडेल.
२१ मूर्खाला जन्म देणारा बाप दुःखी होईल,
बेअक्कल मुलाच्या पित्याला सुख नसतं.+
२३ न्यायाचा मार्ग बदलण्यासाठी
दुष्ट माणूस गुप्तपणे लाच घेतो.+
२५ मूर्ख मुलगा आपल्या बापाला शोक करायला लावतो
आणि त्याला जन्म देणाऱ्या आईचं मन दुखवतो.+
२६ नीतिमानाला शिक्षा देणं* चांगलं नाही;
आदरणीय लोकांना फटके मारणं योग्य नाही.
२८ शांत राहणाऱ्या मूर्खालाही बुद्धिमान समजलं जाईल,
आणि तोंड बंद ठेवणाऱ्याला समंजस मानलं जाईल.