शनिवार, ९ ऑगस्ट
जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं आणि दररोज आपला वधस्तंभ उचलून माझ्यामागे चालत राहावं.—लूक ९:२३.
कदाचित तुम्ही घरच्यांकडून विरोधाचा सामना केला असेल, किंवा राज्याच्या कामाला पहिलं स्थान देण्यासाठी तुम्ही पैसा आणि इतर गोष्टींचा त्याग केला असेल. (मत्त. ६:३३) तुम्ही असं केलं असेल तर यहोवाने तुमचा विश्वासूपणा नक्कीच पाहिलाय याची खातरी तुम्ही ठेवू शकता. (इब्री ६:१०) तसंच, येशूचे शब्द किती खरे आहेत हेही तुम्ही अनुभवलं असेल. त्याने म्हटलं: “ज्यांनी माझ्यासाठी आणि आनंदाच्या संदेशासाठी घरदार, शेतीवाडी, तसंच बहीणभाऊ, आईवडील आणि मुलंबाळं सोडून दिली आहेत, त्यांच्यापैकी प्रत्येकाला सध्याच्या काळात छळासोबत शंभरपटीने घरंदारं, शेतीवाडी, बहीणभाऊ, आईवडील आणि मुलंबाळं आणि येणाऱ्या जगाच्या व्यवस्थेत सर्वकाळाचं जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.” (मार्क १०:२९, ३०) तुम्ही केलेल्या त्यागांच्या तुलनेत तुम्हाला मिळालेले आशीर्वाद कितीतरी पटीने मोठे आहेत.—स्तो. ३७:४. टेहळणी बुरूज२४.०३ ९ ¶५
रविवार, १० ऑगस्ट
खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.—नीति. १७:१७.
यहूदीयातल्या ख्रिश्चनांना एका मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला. अंत्युखियातल्या भाऊबहिणींनी “आपापल्या ऐपतीप्रमाणे यहूदीयातल्या बांधवांना मदत पाठवायचा निश्चय केला.” (प्रे. कार्यं ११:२७-३०) दुष्काळाची झळ बसलेले यहूदीयातले भाऊबहीण जरी त्यांच्यापासून दूर राहत असले, तरीही अंत्युखियातल्या भाऊबहिणींनी त्यांना मदत करायचा निश्चय केला होता. (१ योहा. ३:१७, १८) आपल्या भाऊबहिणींना एखाद्या विपत्तीचा सामना करावा लागतो, तेव्हा आपणसुद्धा त्यांना करुणा दाखवू शकतो. मग आपण हे कसं करू शकतो? आपण त्यांना मदत करायला लगेच तयार राहू शकतो. विपत्ती येते त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या मदतकार्यात आपणही सहभाग घेऊ शकतो का, याबद्दल आपण मंडळीतल्या वडिलांना विचारू शकतो. किंवा, आपण जगभरात केल्या जाणाऱ्या कामासाठी दान देऊ शकतो. तसंच, ज्या भाऊबहिणींना विपत्तीची झळ बसली आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. आपल्या भाऊबहिणींनासुद्धा रोजच्या गरजा भागवण्यासाठी मदतीची गरज पडेल. म्हणून आपण आतापासूनच करुणा दाखवत राहू या. म्हणजे, जेव्हा आपला राजा येशू ख्रिस्त न्यायदंड बजावण्यासाठी येईल, तेव्हा तो आपल्याला पाहील आणि “राज्याचा वारसा” घ्यायचं आमंत्रण देईल.—मत्त. २५:३४-४०. टेहळणी बुरूज२३.०७ ४ ¶९-१०; ६ ¶१२
सोमवार, ११ ऑगस्ट
तुमचा समजूतदारपणा सर्वांना कळून येऊ द्या.—फिलिप्पै. ४:५.
येशूनेसुद्धा दाखवलं की तो यहोवाप्रमाणेच समजूतदार आहे. त्याला पृथ्वीवर फक्त ‘इस्राएलच्या घराण्याच्या हरवलेल्या मेंढरांना’ प्रचार करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. पण या कामातसुद्धा त्याने समजूतदारपणा दाखवला. एकदा एक इस्राएली नसलेली स्त्री त्याच्याकडे येऊन आपल्या मुलीला बरं करण्याची विनंती करू लागली. तिच्या मुलीला एका ‘दुष्ट स्वर्गदूताने पछाडलं’ होतं. येशूने तिची विनंती मान्य केली. आणि तिच्या मुलीबद्दल करुणा असल्यामुळे त्याने तिला बरं केलं. (मत्त. १५:२१-२८) आपण आणखी एक उदाहरण पाहू या. आपलं सेवाकार्य सुरू केल्याच्या काही काळानंतर, येशूने असं म्हटलं: “जो लोकांसमोर मला नाकारतो, त्याला मीसुद्धा . . . नाकारीन.” (मत्त. १०:३३) पण पेत्रने जेव्हा त्याला तीन वेळा नाकारलं तेव्हा येशूने त्याला नाकारलं का? नाही. पेत्रने जो विश्वास दाखवला आणि जो पश्चात्ताप केला तो येशूने लक्षात ठेवला. पुनरुत्थान झाल्यावर येशू जेव्हा पेत्रसमोर प्रकट झाला, तेव्हा त्याने त्याला नक्कीच माफ केल्याचं आणि त्याच्यावर प्रेम असल्याचं सांगितलं असेल. (लूक २४:३३, ३४) यहोवा देव आणि येशू समजूतदार आहेत. मग आपल्याबद्दल काय? यहोवाची अशी अपेक्षा आहे की आपणसुद्धा समजूतदार असलं पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०७ २१ ¶६-७