वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते ८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

शास्ते रूपरेषा

      • एफ्राईमची माणसं गिदोनशी भांडतात (१-३)

      • मिद्यानी राजांचा पाठलाग आणि त्यांची हत्या (४-२१)

      • गिदोन राज्यपद नाकारतो (२२-२७)

      • गिदोनच्या जीवनावर एक नजर (२८-३५)

शास्ते ८:१

समासातील संदर्भ

  • +शास ७:२
  • +शास १२:१; २इत २५:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०००, पृ. २५

शास्ते ८:२

तळटीपा

  • *

    शब्दशः “एफ्राईमचा द्राक्षांचा सरवा, अबियेजेरच्या द्राक्षांच्या संपूर्ण पिकापेक्षा जास्त नाही का?”

समासातील संदर्भ

  • +शास ६:११, ३४; ७:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२१, पृ. १६-१७

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०००, पृ. २५

शास्ते ८:३

समासातील संदर्भ

  • +शास ७:२४, २५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०००, पृ. २५

शास्ते ८:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००४, पृ. १६

शास्ते ८:७

समासातील संदर्भ

  • +शास ८:१६

शास्ते ८:९

तळटीपा

  • *

    अतिशय उंच इमारत.

समासातील संदर्भ

  • +शास ८:१७

शास्ते ८:१०

समासातील संदर्भ

  • +शास ७:१२

शास्ते ८:११

समासातील संदर्भ

  • +गण ३२:३४, ३५

शास्ते ८:१५

समासातील संदर्भ

  • +शास ८:५, ६

शास्ते ८:१६

समासातील संदर्भ

  • +शास ८:७

शास्ते ८:१७

समासातील संदर्भ

  • +शास ८:८, ९

शास्ते ८:२१

समासातील संदर्भ

  • +स्तो ८३:११

शास्ते ८:२२

समासातील संदर्भ

  • +शास ६:१४

शास्ते ८:२३

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:१८; १शमु १०:१९; यश ३३:२२; ४३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८७, पृ. २४

शास्ते ८:२४

समासातील संदर्भ

  • +उत्प १६:११; २५:१३; २८:९; ३७:२८

शास्ते ८:२६

तळटीपा

  • *

    एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +शास ८:२१

शास्ते ८:२७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “त्या एफोदसोबत वेश्‍येसारखी कृत्यं करू लागले.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:६; शास १७:५
  • +शास ६:११
  • +शास २:१७
  • +स्तो १०६:३६

शास्ते ८:२८

समासातील संदर्भ

  • +शास ६:१
  • +शास ३:११; ५:३१

शास्ते ८:२९

तळटीपा

  • *

    म्हणजे, गिदोन. शास ६:३२ पाहा.

समासातील संदर्भ

  • +शास ६:३२; १शमु १२:११

शास्ते ८:३१

समासातील संदर्भ

  • +शास ९:१, २; २शमु ११:२१

शास्ते ८:३२

समासातील संदर्भ

  • +शास ६:११, २४

शास्ते ८:३३

तळटीपा

  • *

    किंवा “बआल दैवतांसोबत वेश्‍येसारखी कृत्यं करू लागले.”

समासातील संदर्भ

  • +शास २:१७, १९; १०:६
  • +शास ९:४

शास्ते ८:३४

समासातील संदर्भ

  • +स्तो १०६:४३
  • +शास ३:७

शास्ते ८:३५

समासातील संदर्भ

  • +शास ९:१६-१८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

शास्ते ८:१शास ७:२
शास्ते ८:१शास १२:१; २इत २५:१०
शास्ते ८:२शास ६:११, ३४; ७:२४
शास्ते ८:३शास ७:२४, २५
शास्ते ८:७शास ८:१६
शास्ते ८:९शास ८:१७
शास्ते ८:१०शास ७:१२
शास्ते ८:११गण ३२:३४, ३५
शास्ते ८:१५शास ८:५, ६
शास्ते ८:१६शास ८:७
शास्ते ८:१७शास ८:८, ९
शास्ते ८:२१स्तो ८३:११
शास्ते ८:२२शास ६:१४
शास्ते ८:२३निर्ग १५:१८; १शमु १०:१९; यश ३३:२२; ४३:१५
शास्ते ८:२४उत्प १६:११; २५:१३; २८:९; ३७:२८
शास्ते ८:२६शास ८:२१
शास्ते ८:२७निर्ग २८:६; शास १७:५
शास्ते ८:२७शास ६:११
शास्ते ८:२७शास २:१७
शास्ते ८:२७स्तो १०६:३६
शास्ते ८:२८शास ६:१
शास्ते ८:२८शास ३:११; ५:३१
शास्ते ८:२९शास ६:३२; १शमु १२:११
शास्ते ८:३१शास ९:१, २; २शमु ११:२१
शास्ते ८:३२शास ६:११, २४
शास्ते ८:३३शास २:१७, १९; १०:६
शास्ते ८:३३शास ९:४
शास्ते ८:३४स्तो १०६:४३
शास्ते ८:३४शास ३:७
शास्ते ८:३५शास ९:१६-१८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
शास्ते ८:१-३५

शास्ते

८ मग, एफ्राईमची माणसं गिदोनला म्हणाली: “तू मिद्यानी लोकांशी लढायला गेलास, तेव्हा आम्हाला का नाही बोलवलंस?+ तू आमच्याशी असं का वागलास?” असं म्हणून ते त्याच्याशी खूप भांडू लागले.+ २ पण तो त्यांना म्हणाला: “मी तुमच्याशी काय बरोबरी करणार? आम्ही जे केलं, त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त तुम्ही केलंय; आणि ही नक्कीच छोटी गोष्ट नाही.*+ ३ देवाने ओरेब आणि जेब या मिद्यानी सेनापतींना तुमच्या हाती दिलं.+ तुमच्या तुलनेत तर मी काहीच केलं नाही.” गिदोन अशा प्रकारे बोलला तेव्हा त्यांचा राग शांत झाला.

४ मग शत्रूचा पाठलाग करत गिदोन यार्देन नदीपर्यंत आला आणि नदी पार करून पलीकडे गेला. तो आणि त्याच्यासोबतचे ३०० पुरुष खूप दमले होते, पण तरीसुद्धा ते शत्रूचा पाठलाग करत राहिले. ५ म्हणून तो सुक्कोथ इथल्या माणसांना म्हणाला: “मी जेबह आणि सलमुन्‍ना या मिद्यानी राजांचा पाठलाग करतोय. आणि माझ्यासोबतची माणसं फार थकली आहेत. कृपा करून त्यांना खायला काही भाकरी द्या.” ६ पण, सुक्कोथचे प्रमुख त्याला म्हणाले: “आम्ही तुझ्या सैन्याला भाकर का द्यावी? तू तर जेबह आणि सलमुन्‍ना यांना अजून पकडलेलंही नाही.” ७ त्यावर गिदोन म्हणाला: “ठीक आहे. आता माझंही ऐका. यहोवा जेबह आणि सलमुन्‍ना यांना माझ्या हाती देईल, तेव्हा रानातल्या काटेरी झुडपांनी मी तुम्हाला मार देईन.”+ ८ तिथून तो पनुएल इथे गेला. तिथल्या माणसांकडेही त्याने भाकरी देण्याची विनंती केली. पण, पनुएलच्या माणसांनीसुद्धा त्याला सुक्कोथच्या माणसांसारखंच उत्तर दिलं. ९ म्हणून पनुएलच्या माणसांनाही तो म्हणाला: “मी विजयी होऊन परत येईन, तेव्हा तुमचा हा मनोरा* पाडून टाकीन.”+

१० जेबह आणि सलमुन्‍ना आपल्या सैन्यांसोबत, म्हणजे जवळजवळ १५,००० सैनिकांसोबत कर्कोर इथे होते. पूर्वेकडच्या लोकांच्या+ संपूर्ण सैन्यात इतकेच काय ते लोक उरले होते; कारण, त्यांचे १,२०,००० योद्धे मारले गेले होते. ११ मग गिदोन हा नोबह आणि यागबहाच्या+ पूर्वेकडे तंबूत राहणाऱ्‍या लोकांच्या रस्त्याने पुढे गेला, आणि बेसावध असलेल्या शत्रूच्या छावणीवर त्याने हल्ला केला. १२ जेबह आणि सलमुन्‍ना हे दोन मिद्यानी राजे पळाले, तेव्हा गिदोनने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं; आणि त्यांच्या छावणीतल्या सगळ्यांचा थरकाप उडवला.

१३ मग योवाशचा मुलगा गिदोन युद्धातून परत येताना हेरेसच्या चढावरून आला. १४ येताना रस्त्यात त्याने सुक्कोथच्या एका तरुण माणसाला धरलं आणि माहिती काढण्यासाठी त्याला प्रश्‍न विचारले. तेव्हा, त्या माणसाने त्याला सुक्कोथच्या प्रमुखांची आणि वडिलांची, अशा ७७ जणांची नावं लिहून दिली. १५ मग गिदोन सुक्कोथच्या माणसांकडे आला आणि म्हणाला: “तुम्ही मला टोमणा मारून म्हणाला होता ना, की ‘आम्ही तुझ्या थकलेल्या माणसांना भाकर का द्यावी? तू तर जेबह आणि सलमुन्‍ना यांना अजून पकडलेलंही नाही?’+ तर आता हे बघा, जेबह आणि सलमुन्‍ना!” १६ मग, त्याने सुक्कोथच्या वडिलांना धरलं आणि त्यांना रानातल्या काटेरी झुडपांनी मारून चांगलाच धडा शिकवला.+ १७ त्याने पनुएलचा+ मनोराही पाडून टाकला आणि त्या शहरातल्या माणसांना मारून टाकलं.

१८ गिदोनने जेबह आणि सलमुन्‍ना यांना विचारलं: “तुम्ही ताबोरमध्ये ज्या माणसांना मारून टाकलं ते कसे दिसत होते?” त्यावर ते म्हणाले: “ते तुझ्यासारखेच दिसत होते. ते सगळे राजपुत्र वाटत होते.” १९ तेव्हा तो म्हणाला: “ते सगळे माझे सख्खे भाऊ होते. मी जिवंत देवाची, यहोवाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही जर त्यांना ठार मारलं नसतं, तर मीही तुम्हाला ठार मारलं नसतं.” २० मग तो आपल्या प्रथमपुत्राला, येथेरला म्हणाला: “ऊठ, मारून टाक यांना.” पण, त्या तरुणाने आपली तलवार काढली नाही; तो खूप घाबरला होता, कारण तो वयाने अजूनही लहानच होता. २१ तेव्हा, जेबह आणि सलमुन्‍ना गिदोनला म्हणाले: “तुझ्यात हिंमत असेल, तर तूच मार आम्हाला.” म्हणून मग गिदोन उठला आणि त्याने जेबह आणि सलमुन्‍ना यांना मारून टाकलं.+ आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यातले चंद्रकोरीच्या आकाराचे दागिनेही त्याने काढून घेतले.

२२ पुढे इस्राएली माणसं गिदोनला म्हणाली: “तू आम्हाला मिद्यानी लोकांच्या हातून सोडवलंस.+ तेव्हा, आता तूच आमच्यावर राज्य कर. तुझ्यानंतर, तुझ्या मुलांनी आणि नातवांनी आमच्यावर राज्य करावं.” २३ पण, गिदोन त्यांना म्हणाला: “मी तुमच्यावर राज्य करणार नाही. आणि माझी मुलंही तुमच्यावर राज्य करणार नाहीत. यहोवाच तुमच्यावर राज्य करेल.”+ २४ गिदोन पुढे म्हणाला: “माझी तुम्हाला एकच विनंती आहे: तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या लुटीतून मला एक नथ द्यावी.” (कारण, इस्राएली लोकांनी ज्यांना हरवलं होतं ते इश्‍माएली+ लोक सोन्याच्या नथी घालायचे.) २५ ते त्याला म्हणाले: “आम्ही त्या आनंदाने देऊ.” मग, त्यांनी एक चादर पसरवली आणि प्रत्येक माणसाने आपल्या लुटीतली एक नथ त्यात टाकली. २६ गिदोनने मागून घेतलेल्या सोन्याच्या नथींचं वजन १,७०० शेकेल* इतकं भरलं. याशिवाय त्याला, चंद्रकोरीच्या आकाराचे दागिने, तसंच कानांतले, मिद्यानी राजांचे जांभळ्या रंगाचे लोकरीचे कपडे आणि उंटांच्या गळ्यातले हारसुद्धा मिळाले.+

२७ मग गिदोनने, मिळालेल्या सोन्यापासून एक एफोद*+ बनवलं आणि ते अफ्रा+ या आपल्या शहरात ठेवलं. पण, सर्व इस्राएली लोक त्या एफोदची उपासना करू लागले.*+ आणि ते गिदोन व त्याच्या घराण्यासाठी एक पाश ठरलं.+

२८ अशा प्रकारे, मिद्यानी+ लोक इस्राएलच्या अधीन झाले आणि ते पुन्हा कधीच इस्राएलच्या विरुद्ध उठले नाहीत. आणि गिदोनच्या काळात, देशात ४० वर्षं शांती टिकून राहिली.+

२९ योवाशचा मुलगा यरुब्बाल*+ आपल्या घरी परत आला आणि तिथेच राहिला.

३० गिदोनला ७० मुलं झाली, कारण त्याला बऱ्‍याच बायका होत्या. ३१ शखेममध्ये त्याची जी उपपत्नी होती, तिच्यापासून त्याला एक मुलगा झाला. त्याचं नाव त्याने अबीमलेख+ ठेवलं. ३२ मग बरीच वर्षं जगल्यावर, योवाशचा मुलगा गिदोन वृद्ध होऊन मरण पावला. आणि त्याला अबीयेजरी+ लोकांच्या अफ्रा या ठिकाणी, त्याच्या वडिलांच्या कबरेत पुरण्यात आलं.

३३ गिदोनच्या मृत्यूनंतर, इस्राएली लोक पुन्हा बआल+ दैवतांची उपासना करू लागले.* आणि त्यांनी बआल-बरीथ याला आपला देव मानलं.+ ३४ ज्या देवाने इस्राएली लोकांना त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून वाचवलं होतं,+ त्या आपल्या यहोवा देवाला ते विसरून गेले.+ ३५ तसंच यरुब्बालने, म्हणजे गिदोनने इस्राएली लोकांसाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टीही ते विसरून गेले, आणि त्यांनी गिदोनच्या घराण्याला एकनिष्ठ प्रेम दाखवलं नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा